Wednesday, 8 February 2012

तुझ्याशिवाय हे आयुष्य कुठवर होतं
माझं सारं जीवन तुझ्याच नावावर होतं

... तू गेलीस तेँव्हा घरानेही श्वास रोखलेला
तुझ्या आठवणीँच वादळ माझ्या घरावर होतं
... ...
गूदमरत होता बेभान वार अंगणात माझ्या
कधी तू माळलेलं गूलाब त्या दारावर होतं

तो मेघ ही वेढा आज ऊगाच बरसून गेला
आधीच आसवांच पाणी माझ्या गालावर होतं

असाच कोलमडुन पडला घराचा तो कोनवसा
तुझ्या विरहाचं ओझं त्याच्याही मनावर होतं

कुंपणात म्हणे काल ते निवडुंग कुचबुजत होत
त्याचही प्रेम त्या निर्दयी अंगणावर होतं

तुझ्याशिवाय हे आयुष्य असच सरतय
आता माझं आयुष्यही मला कंटाळल होत

No comments:

Post a Comment